कसं समजवू

कसं समजवू या वेड्या मनाला कसा बांध घालू अंतरीच्या भावनांना
सांगेल का हे कुणी मल कसा आवरू मी या माझ्या वेड्या मनाला
कधी हे तिच्या आठवणीत रमते कधी सागराचा पैलतीर, हे गाठून येते
कधी व्याकुळलेल्या चातकापरी तिच्या प्रेमासाठी हे झुरते



कधी डोळ्यांतून अश्रू होऊन गळते तर कधी आनंदात न्हावून जाते
कधी हळूच रुसते, कधी गुदमरून हे जाते भाभडे हे मन माझे स्वप्नांच्या मागून धावते
समजावलं जरी याला किती, हे वेड्यासारखे वागते कधी तिच्या सहवासासाठी, मन हे व्याकूळ होते.
आवरू कसा या मनाला, मन मनालाच हे छळते आणि हे वेड मन माझं, तिच्याच मागून धावते.
Previous Post Next Post